+918048033049
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
शरद ऋतुचर्या व विरेचन (Virechan Panchakarma- Pitta Detoxification in Marathi) { Best panchakarma for Pitta Diseases } वर्षा ऋतुचा जोर हळु हळु कमी होत आहे व शरद ऋतु चे आगमन केव्हाच झाले आहे. वर्षा ऋतुच्या थंड व आर्द्र वातवरणापेक्षा विपरीत असलेला दिवसा कडक उन व रात्री शीतल असा हा शरद ऋतु. अश्विन व कार्तिक या दोन महिन्यांमधे(Mid September to Mid November) येणारा हा ऋतु कित्येकांना सुखद वाटतो तर काहींना उन्हामुळे नको नकोसा होतो. यालाच आपण हल्ली October heat म्हणतो. कवी कालिदास तसेच तुलसीदासांनी या ऋतु चे अगदी सुंदर वर्णन केले आहे. वर्षा संपत आल्यानंतर हीरवीगार नववधु प्रमाणे सजलेली सृष्टी, तलावांत उमललेले कमळ, हंसांचा कलरव व रात्री शरदाचं चादणं हे सर्वच मनमोहक असते. असे असुनही पित्त प्रकृती च्या व्यक्ती तसेच इतर पित्ताचा त्रास असलेल्यांसाठी हा काळ कठीण ठरतो. कारण आधीच्या वर्षा ऋतुच्या दरम्यान शरीरात संचीत झालेले पित्त शरदात वाढलेल्या उष्णतेने प्रकुपित होउ लागते. अशा पद्धतीने प्रकुपित झालेले पित्त शरीरात अनेक पित्ताच्या आजारांना जसे अम्लपित्त, त्वचा विकार, पोटाचे विकार, शरीराची व हात-पायांची जळ-जळ होणे, अनिद्रा, तोंड येणे (Stomatitis) इत्यादींना कारणीभुत ठरते. आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्य रक्षणास रोग चिकित्से इतकेच कींबहुना त्यापेक्षा जास्त महत्व दिले आहे या साठी आयुर्वेदात दिनचर्या व ऋतुचर्या यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. ऋतुनुसार व्यक्तिने आपली जीवनशैली बदलली तर कुठलाही आजार होण्याची शक्यता अतिशय कमी असते. *या ऋतुमधे वाढलेला पित्त दोष शरीराबाहेर काढण्यासाठी विरेचन हे पंचकर्म करुन घ्यावे तसेच त्वचारोगांसाठी रक्तमोक्षण करून शरीर शुद्ध करावे.* *विरेचन- (Pitta Detoxification - Medicated Purgation)* शरद ऋतुमधे प्रकुपित झालेला पित्त दोष शरीराबाहेर काढण्यासाठी सर्वात उत्तम पंचकर्म म्हणजे विरेचन होय. यालाच हल्ली *Liver detox* किंवा *colon detox* असे देखिल म्हटले जाते कारण विरेचनामुळे यकृत व आतड्यांमधील सर्व Toxins / दोष हे शरेराबाहेर काढले जातात. या ऋतुच्या सुरुवातीस विरेचन करुन घेतल्यास वर्षभर पित्ताचे कुठलेही आजार होण्याची शक्यता फारच कमी असते. विरेचनासाठी साधारणत: 7 ते 15 दिवसांचा कालवधी लागतो. विरेचन करताना प्रथम व्यक्तीची तपासनी करुन तो विरेचनासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. व यानंतर पुर्वकर्म, प्रधानकर्म व पश्चात कर्म यांचा समावेश होतो. *पुर्वकर्म-* यात व्यक्तीस 7 दिवस पाचन व रुक्षण औषधी दिल्या जातात व यानंतर स्नेहनासाठी व्यक्तीच्या प्रकृती व दोषांनुसार योग्य औषधी घृत (तुप) रोज सकाळी दिले जाते. या घृताचा डोस देखिल प्रकृती व पचनशक्ती नुसार बदलतो. साधारणत: 3 ते 7 दिवस घृतपान केल्यानंतर 2 दिवस बाह्य स्नेहन स्वेदन म्हणजेच औषधी तेलाने 45 ते 50 मिनिटे अभ्यंग व त्यानंतर औषधी काढ्याने स्वेदन (स्टीमबाथ) केले जाते. *प्रधानकर्म-* स्नेहन स्वेदन झाल्यानंतर विरेचनाच्या दिवशी सकाळी जुलाबाचे औषध देउन नियंत्रित पद्धतीने जुलाब घडवुन आनले जातात. पुर्वकर्मामुळे आमशयामधे जमलेले पित्त दोष यामुळे पुर्णत: शरीराबाहेर काढले जाते. साधारण 10 ते 30 वेग किंवा व्यक्तीच्या शक्तीनुसार जुलाब घडवुन आनले जातात. *पश्चातकर्म-* विरेचनामुळे शरीरातील दोष बाहेर पडलेले असतात. यासाठी नंतर २ दिवस आराम करणे योग्य. तसेच विरेचनामुळे पचन शक्तीदेखिल कमी होते व ती हळु हळु वाढवण्यासाठी आहार योग्य हळु हळु पचन्यास जड अशा क्रमाणे घेने गरजेचे असते यालाच संसर्जन क्रम म्हणतात. यात मुगाच्या डाळीच्या पेज पासुन सुरुवात करुन हळु हळु 3 ते 6 दिवसात पुर्वीच्या आहारपर्यंत यावे लागते. अशा पद्धतीने झालेल्या विरेचनामुळे पित्ताचा त्रास तत्काळ कमी होऊन, पचनशक्ती, बल , उत्साह, वर्ण यांमध्ये देखिल वृद्धी होते. डॉ. प्रतिभा जायभाय स्त्री रोग प्रसूति तज्ञ आयुर्वेद तज्ञ काश्यप क्लिनिक सिंहगड कॉलेज रोड 9420312930 काश्यप क्लिनिक