+918048033049
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
आजकाल अनेक महिलांना (Hormonal Imbalance In Marathi) हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे. हॉर्मोन्सचे असंतुलन ही एक सायलेंट किलर समस्या आहे. कारण याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतात. महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, सेक्सची इच्छा नसणं ही या समस्येची लक्षणे असू शकता. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं. पौगंडावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, मॅनोपॉज अशा अनेक अवस्था महिलांच्या आयुष्यात येत असतात. या अवस्था पार पडल्यावर हॉर्मोन्स पुन्हा नैसर्गिकरित्या नियंत्रित होत असतात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक महिलांना हॉर्मोनल इमबॅलेंस या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, काही विशिष्ठ आजार ही यामागची कारणे असू शकतात. महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर हॉर्मोन्स संतुलित असणे गरजेचे आहे. मात्र काही कारणांमुळे जेव्हा हे हॉर्मोन्स असतुंलित होतात तेव्हा महिलांना PCOS, PMS, अर्ली मॅनोपॉज अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. एस्ट्रोजन (estrogen) च्या कमतरतेमुळे त्यांना थकवा, चिडचिड, नैराश्य अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल आणि योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचे जीवन निरोगी करू शकता. थोडक्यात महिला दिनानिमित्त Balance Your Hormones & Balance Your Life. हॉर्मोन्सचे असंतुलन म्हणजे काय? (Hormone Imbalance ) हॉर्मोनल असंतुलनाची लक्षणे (Hormonal Imbalance Symptoms) हॉर्मोन्स असंतुलन होण्याची कारणे (Hormonal Imbalance Causes ) हॉर्मोनल असंतुलन असल्यास काय करावे? (Hormonal Imbalance Treatment In Marathi) हॉर्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी कोणासाठी गरजेची आहे? (Hormones Replacement Therapy) जीवनशैलीमध्ये हे थोडेसे बदल करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता (Lifestyle Changes To Balance Your Hormones) यासाठी याबाबत काही गोष्टी स्त्री आणि पुरूष दोघांनाही माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण योग्य उपचार आणि जोडीदाराची साथ असेल तर कोणतीही आरोग्य समस्या सोडवणं महिलांना सोपं जावू शकतं. *अयोग्य आहार* *(Inappropriate Diet)* संतुलित आहार हा निरोगी जीवनाचा मुलमंत्र आहे. मात्र आजकाल जगाच्या वेगाने धावतान योग्य आहाराकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. तसंच पाळी लवकर येण्यासाठी उपाय केले जातात. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो. *नैराश्य (Depression)* नैराश्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चुकीचा परिणाम होत असतो. कारण तुमच्या मनःस्थितीचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर त्वरीत परिणा्म दिसू लागतो. निराशाग्रस्त असल्यास तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हॉर्मोनल इंमबॅलेंसला सामोरं जावं लागू शकतं. जीवनशैलीमध्ये हे थोडेसे बदल करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता (Lifestyle Changes To Balance Your Hormones) व्यायाम आणि योगासने (Exercise And Yoga) नियमित व्यायाम आणि योगासने करा ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील. व्यायामामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत चालते. योग्य आहार घ्या (Appropriate Diet) हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. यासाठी सेंद्रिय धान्य, फळे, ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. आहारातून मीठ आणि साखर कमी करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे Ca, B12, D3 या सप्लीमेंटचे प्रमाण वाढवा. पुरेशी झोप (Get Enough Sleep) दिवसभरात कमीतकमी आठ तास झोप घ्या ज्यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. अपुऱ्या झोपेमुळे तुमचे आरोग्य बिघडते. शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी दररोज वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा. जीवनशैलीत थोडे बदल करून आपलं आरोग्य नक्कीच सुधारता येऊ शकतं. यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा आणि निरोगी राहण्यासाठी आम्ही सांगितलेले बदल करा. व्यायाम, सतुंलित आहार, सकारात्मक विचारशैली, पुरेशी झोप, ताण-तणावापासून दूर राहून तुम्ही तुमचं जीवन आनंदात जगू शकता. लक्षात ठेवा जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे त्यामुळे निरोगी रहा आणि जगण्यातील खरा आनंद घ्या. निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक ॠतु चर्या आणि दिनचर्या तसेच आयुर्वेदिक उपचार घ्या. अधिक माहिती साठी संपर्क करा . काश्यप क्लिनिक, सिंहगड कॉलेज रोड, वडगाव बुद्रुक, 9156500430